मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात करा

वैभव नाईकांच्या सूचना
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 05, 2023 20:59 PM
views 63  views

मालवण :  मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनची मुख्य इमारत, मुलांचे वसतिगृह, व प्रसाधनगृहाची इमारत दुरुस्त करणे रंगरंगोटी करणे या कामासाठी आमदार वैभव नाईक आणि तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच उच्च व  तंत्रशिक्षण विभागाचे सचिव यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून दिड कोटी रु. निधी मंजूर केला होता या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षतेमुळे अद्याप काम सुरु झाले नाही. आज मालवण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याशी चर्चा केली. तात्काळ या कामाची वर्कऑर्डर देऊन कामाला सुरुवात करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या. 

           तसेच इतर समस्यांचा आ.  वैभव नाईक यांनी आढावा घेतला. प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतला. प्राध्यापक व कर्मचारी वर्गाची पूर्तता करण्यासाठी उच्च व  तंत्रशिक्षण विभागाचे  मंत्री व सचिव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. 

              याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर, राहुल परब, सिद्धेश मांजरेकर  प्रा. डॉ. योगेश महाडिक, प्रा. बडेकर, प्रा. तलवारे, प्रा. गोलतकर, प्रा. महाडिक आदी उपस्थित होते.