
वेंगुर्ले : जुलै 2025 पासून, म्हणजे जवळ पास एक महिना शिरोडा पंचक्रोशीतील ATM मशीन बंद आहेत. त्यामुळे शिरोडा पंचक्रोशीतील लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. आता ऑगस्ट 2025 मध्ये कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी साजरा होणार आहे.
गणेश चतुर्थीला मुंबई, पुणे व इतर ठिकाण वरून चाकरमानी येणार आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थी च्या वेळी ATM मशीन बंद असणे गैरसोयीचे होणार आहे. हे लक्षात घेता ATM मशीन चालू करण्याच्या सूचना संबंधित बँकांना द्याव्या अशी मागणी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश परब यांनी निवेदनाद्वारे वेंगुर्ले तहसीलदार यांच्याकडे केली आहे.