मंत्री केसरकरांविरोधातले 'ते' बॅनर हटविण्यास सुरुवात !

योगेश महालेंनी वेधलं होतं पोलीसांचं लक्ष
Edited by: संदीप देसाई
Published on: November 15, 2023 12:10 PM
views 643  views

दोडामार्ग : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी मंत्री केसरकर यांच्या नावाने थेट बॅनरबाजी करत त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. दोडामार्गमधील घसरलेली रुग्णसेवा व रोजगार, पर्यटन आणि विकास हे मुद्दे पकडून काहींनी दिवाळीत दीपक केसरकर यांच्या नावाने बॅनरबाजी करत शिमग्याचे वातावरण तयार केले आहे.

दरम्यान, या बॅनरबाजीबाबत दोडामार्ग शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश महाले यांनी दोडामार्ग पोलिसांचे पत्र देत लक्ष वेधले आहे. दोडामार्ग शहर व इतर ठिकाणी आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निषेधार्थ आक्षेपार्ह लावलेलं बॅनर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्वरित हटवण्याची मागणी महाले यांनी केली आहे. त्यानुसार दोडामार्ग शहरासह तालुक्यात बांदा व तिलारी राज्यमार्गवर सुद्धा लावलेलं बॅनर हटविण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.