गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या पाठीशी रहा : संदीप साटम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 15, 2024 14:25 PM
views 126  views

देवगड : देवगड तालुक्यातील साळशी - देवणेवाडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून मंजूर असलेल्या रस्त्याच्या विकासकामाचे डांबरीकरण  भूमिपूजन माजी प. स. सदस्य सुनील गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी, भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी कायम  भाजपच्या पाठिशी रहा असे मत व्यक्त केले. केंद्रीय  मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजपचे शिरगाव विभागीय अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य वैभव साळसकर, माजी प.स.सदस्य सुनील गावकर, माजी सरपंच सत्यवान सावंत, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, रविकांत सावंत, प्रविण राणे आदी ग्रामस्थ आदी  उपस्थित होते.