
वैभववाडी : वैभववाडीहून मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वैभववाडीतून बोरीवलीला जाणारी एसटी बस उद्यापासून प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे.आम नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महामंडळाने कार्यवाही केली आहे. कणकवलीहून दरदिवशी सायंकाळी ही बस सुटणार आहे. फोंडा, वैभववाडी मार्गे तळेरे मुंबई असा या बसचा मार्ग असणार आहे.गेली कित्येक वर्षे बंद असलेली मुंबई बस सेवा आता सुरळीत होणार आहे.