
देवगड : देवगड आगारात सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ४ वाहकांना पदोन्नतीने वाहतूक नियंत्रक पदी तात्पुरती बदलीच्या ठिकाणी नेमणूक देण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीने बदली झालेल्या वाहकांच्या जागी मालवण आगारातील वाहक संजय वसंत येरम, दिनेश शांताराम साळकर, सावंतवाडी आगारातील वाहक लक्ष्मण जिनदास बोगार, राजन पांडुरंग धरणे यांची रापम देवगड आगारात वाहतूक नियंत्रक पदी नियुक्ती देण्यात येवून ते सेवेत रुजू झाले आहेत.
तसेच तात्पुरती बदलीच्या ठिकाणी नेमणूक देण्यात आलेल्या वाहक प्रभाकर राजाराम कामत वाहतूक नियंत्रक कुडाळ आगार, वाहक विनोद वसंत करंदीकर वाहतूक नियंत्रक कुडाळ आगार ,साईनाथ सदाशिव ओटवकर वाहतूक नियंत्रक वाहक सुशील बाजीराव नाईक वाहतूक नियंत्रक विजयदुर्ग आगार या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली.तसेच चालक श्रीकृष्ण चंद्रकांत माळवदे यांची सहा.वाह.निरीक्षक पदी निवड झाल्याने त्यांची मार्ग तपासणी पथक रापम सिंधुदुर्ग विभाग या ठिकाणी बदली झाली आहे.