एसटी कामगार सेनेच्या फलकाचे वैभव नाईकांच्या हस्ते उदघाटन

Edited by:
Published on: April 09, 2025 16:13 PM
views 207  views

कुडाळ : कुडाळ हायवेवरील एसटी डेपो येथे शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा फलक लावण्यात आला असून आज या फलकाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी  एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैभव नाईक यांचा सत्कार केला.

एसटी कामगार सेना हि एसटी कमर्चारी हितासाठी सातत्याने कार्यरत असणारी एकमेव संघटना आहे. एसटी कामगार सेनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविला जातो. त्याचबरोबर एसटी कामगार सेनेच्या फलकाद्वारे आता सभासदांना वेगवेगळ्या सूचना व  कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे असे वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. 

याप्रसंगी एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक , शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, पपू म्हाडेश्वर, कामगार सेनेचे जिल्हा सचिव आबा धुरी, कुडाळ आगार अध्यक्ष दीपक भोगले, सचिव अमोल परब, एम. आर. दळवी, महेश वेंगुर्लेकर, भाऊ बोगार, सचिन ठाकूर, श्री. रासम, श्री. मोरे इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.