
सावंतवाडी : सध्या सावंतवाडी- नृसिंहवाडी एसटी बसच्या चालकाचा एसटी बस स्वच्छ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चालक अमोल भिरवंडेकर यांची कृती अनेकांना भावली असून लालपरीवर प्रेम करणाऱ्यांची मन जिंकायच काम या चालकान केलं आहे. दरम्यान, याबाबत चालकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याच काम सावंतवाडी डेपोतून केलं आहे. सोहम परब यांच्या कडून व संकेत पवार यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.