रस्त्याच्या मधोमध अडकली ST बस

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 16, 2023 11:21 AM
views 406  views

कुडाळ : कणकवली सावंतवाडी बसचे मागील चाक अचानक फिरणं बंद झाल्याने ही बस मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे रस्त्याच्या मधोमध अडकली आहे. वाहन चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागील चाके फिरत नसल्याचे वाहन चालकाच्या निदर्शनास आल्याने या बसमधील प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

कणकवली आगाराची कणकवली सावंतवाडी बस  गाडी क्र एम एच 07 सी 9236 ही बस पावशी येथे रस्त्याच्या मधोमध बंद पडली आहे. वाहन चालक आर. बी. सावंत तसेच वाहक बी. ए. बांगर यांनी प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करत दुसऱ्या बसने कुडाळ बस स्थानकात प्रवाशांना पाठविण्यात आले आहे.