
दोडामार्ग : तिलारी घाट मार्गे एसटी बस सेवा सुरु केली नसल्याने आज सरपंच सेवा संघटना दोडामार्ग यांनी कोल्हापूर जिल्हाधीकारी कार्यालय समोर येथे बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे. गेली ४० वर्षे अविरत तिलारी घाट मार्गे सुरु असलेली एसटी बस सेवा कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहतुकीबरोबर बंद केली असल्याने सर्व प्रवशांची एकच तारंबळ उडाली आहे.
गेल्या ४ महिन्यापासून तिलारी घाट मार्गे एसटी बस बंद असल्याने दोडमार्ग, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर येथील प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे या घाटातून तात्काळ एसटी बस सेवा सुरळीत सूरु करावी अशी मागणी येथील जनतेने व सरपंच सेवा समघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी निवेदनाद्वारे केली होती. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सरपंच सेवा संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर सोमवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे. जो पर्यंत एसटी बस सेवा तिलारी घाटातून सुरु होत माही तो पर्यंत आमचे उपोषण सुरूच राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी म्हटले आहे.