माटणे व सोनावल हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बसची सोय

शिवसेनेच्या मागणीला यश उपजिल्हाप्रमुख बाबुराव यांची माहिती
Edited by: संदीप देसाई
Published on: March 01, 2023 20:27 PM
views 128  views

दोडामार्ग:

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा उद्या गुरुवारपासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी मागणी केल्यानुसार सावंतवाडी आगाराने सोनावल ते दोडामार्ग व माटणे ते दोडामार्ग अशा दोन एसटी बसेसची सोय केली आहे. त्यामूळे विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घेऊन या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री, धुरी यांनी केले आहे.

उद्यापासून दहावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने माटणे व सोनावल हायस्कूलच्या मुलांची परीक्षा केंद्रापर्यंत एसटी फेरीची मागणी सावंतवाडीचे आगारप्रमुख श्री. बोधे यांच्याकडे बाबूराव धुरी यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन गुरूवारी सकाळी ९ वाजता माटणे ते दोडामार्ग व सोनावल हायस्कूल ते दोडामार्ग परीक्षा केंद्रापर्यंत सकाळी नऊ वाजता सोनावल येथून एसटी फेरी सुटणार आहे. तरी त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन बाबुराव धुरी यांनी केले आहे. सहकार्याबद्दल श्री. बोधे यांचे धुरी यांनी आभार मानले आहेत.