कुडाळ हायस्कूलचा 100 टक्के निकाल !

परीस कुबल 98. 60 टक्क्यांसह शाळेत पहिला
Edited by: जुईली पांगम
Published on: May 27, 2024 09:55 AM
views 438  views

कुडाळ : कुडाळ हायस्कूल कुडाळने 10 वीत घवघवीत यश संपादन करण्याची आपली परंपरा कायम राखलीय निकाल 100 टक्के लागलाय. परीस प्रसाद कुबल 98. 60 टक्के गुण मिळवत शाळेत पहिला आलाय. आर्या संतोष चिपकर 96 टक्के गुण मिळवत दुसरी आलीय. अंकिता अविनाश घाटगे 95. 20 टक्के गुण मिळवत तिसरी आलीय. त्याखालोखाल सौमित्र विश्वास मुंडले 95 टक्के, हर्ष प्रसाद परब 95 टक्के, मधुरा दत्तात्रय जडये 93. 80 टक्के गुण मिळवलेत. 

कुडाळ हायस्कूलने 10 वीच्या निकालात आपला दबदबा राखालाय. शाळेच्या 105 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केलय. प्रथम श्रेणीत 56 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे 26 विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे संस्कृत विषयात 10 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवलेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्यावतीने अभिनंदन करण्यात आलंय.