
देवगड : एस्.एस्.सी. मार्च 2025- माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये प्रथम 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा साळशी हायस्कूलमध्ये सत्कार व नवीन प्रसाधन गृहाचे लोकार्पण सोहळा सर्व विद्यार्थी, पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाली. प्रथम क्रमांक प्राप्त केतकी साळसकर हिचा सत्कार तिच्या वतीने तिच्या पालकांनी- सत्यवान सावंत (संस्था -अध्यक्ष) यांच्या हस्ते स्विकारला. द्वितीय क्रमांक प्राप्त मदार साळसकरचा सत्कार – त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत प्रशालेचे मुख्याध्यापक- माणिक वंजारे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आला. सोहम नाईक (दुसरा क्रमांक) याचा सत्कार संस्था सदस्य- संतोष साळसकर यांच्या हस्ते पार पडला. तृतीय क्रमांक प्राप्त दिव्या गावकरचा सत्कार स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले यांच्या हस्ते देण्यात आला. या सर्व सत्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह होते. याच कार्यक्रमात इयत्ता आठवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशांचे वाटप उपस्थित मान्यवर व पालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमांमध्ये सर्व सोयींनी युक्त विद्यार्थी नवीन प्रसाधनगृहाचे उद्घाटन, इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते, सर्व पालक, विद्यार्थी व मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमात प्रशालेचे मुख्या.- माणिक वंजारे,स्कूल कमिटी -चेअरमन सत्यवान भोगले व संस्था अध्यक्ष -सत्यवान सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे व त्यांचा उत्साह वाढवणारे विचार व्यक्त केले.या कार्यक्रमात संस्था सदस्य,स्कूल कमिटी सदस्य,पालक,विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन स्वप्नील भरणकर यांनी केले.तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले.