
मालवण : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संलग्न, सिधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेत श्री रेकोबा हायस्कूलने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेला आठवी मधून शाळेतून 16 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. आठवीचा निकाल १००% लागला आहे. इयत्ता आठवी मधील 12 विद्यार्थी व पाचवी मधील 6 विदयार्थी प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
इ. ८ वी मधील कु. वेद प्रविण कुबल याने १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. आठवीतील पाच विद्यार्थांना विशेष प्राविण्य, सहा विद्यार्थी प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे.पाचवीमधील एका विद्यार्थ्याला विशेष प्राविण्य तर पाच विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. यासर्व विद्यार्थ्यांना गणित विषय शिक्षक रामचंद्र गोसावी व प्रवीण कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थीवृंद, यांनी अभिनंदन केले.