श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा १२ वीचा निकाल ९९.२६ %

ऐश्वर्यानंद सावंत ९१ % प्रथम
Edited by: विनायक गावस
Published on: May 25, 2023 16:52 PM
views 132  views

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा १२ वीचा निकाल ९९.२६ % एवढा लागला आहे. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विभागात २७२ पैकी २७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रशालेत ऐश्वर्यानंद सावंत ९१.००% प्रथम, द्वितीय रिया नाईक ९०.५०% तर तृतीय साक्षी मसुरकर ८९.८३ % मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.   

आर्ट्स विभागात मृण्मयी पेडणेकर ८६.१७ %प्रथम, सुहानी नाईक व संजना सावंत ७४.३३ % द्वितीय, ट्रीझा फर्नांडिस ७३.००% तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर कॉमर्स शाखेत ऐश्वर्यानंद सावंत ९१.००% प्रथम, द्वितीय रिया नाईक ९०.५०% तर तृतीय साक्षी मसुरकर ८९.८३ % मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सायन्स शाखेतून धनराज कदम ८६.६७ % प्रथम, मधुरा वाडकर ८२.५०% द्वितीय, समृद्धी चव्हाण ७९.३३% तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.