
वैभववाडी : सांगुळवाडी येथील श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट यांच्यावतीने श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या मठात काल पासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये दि. १२ व १३ डिसेंबर पासून दर दिवशी पूजापाठ, घटस्थापना, महाआरती, महाप्रसाद, कार्यक्रम संपन्न झाले.
तसेच दत्त जन्मोत्सवा दिवशी सकाळी ८.३० वा. पूजा पाठ, १०.३० वा.दत्तयाग होम हवन, दुपारी महाआरती ,महाप्रसाद, सायंकाळी दत्त जन्म व्याख्यान, दत्त जन्मोत्सव, महाआरती, रात्री पालखी मिरवणूक व महिलांचा २०-२० डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.