
सावंतवाडी : खासकीलवाडा येथील रहिवासी व सध्या म्हापसा-गोवा येथे वास्तव्यास असलेले दत्तप्रसाद उर्फ राजू नाचणोलकर (५८) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी सावंतवाडीत पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. उत्कृष्ट टेबलटेनिसपटू व खोखो म्हणून महाविद्यालयीन जीवनात ते प्रसिद्ध होते.
आरपीडी हायस्कूलमधून त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती. मोठा मित्रवर्ग त्यांच्या आहे. त्यांच्या अकाली निघून जाण्यानं मित्रपरीवारात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, बहीण असा परिवार आहे. माजी नगरसेविका विजया नाचणोलकर यांचे ते सुपुत्र होते.