मिनी ऑलंपिकसाठी क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांची पंच म्हणून निवड

जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे होणार स्पर्धा
Edited by: संदीप देसाई
Published on: December 29, 2022 19:37 PM
views 188  views

दोडामार्ग : जिल्हा क्रीडा संकूल जळगांव येथे २ ते ५ जानेवारी दरम्यान संपन्न होणार्‍या महाराष्ट्र राज्य मिनि ओंलपिक साॅफ्टबाॅल स्पर्धेसाठी कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज आॅफ सायन्स प्रशालेचे क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांची पंच म्हणून निवड झाली आहे. 

  धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्थेचे अध्यक्षा सिमाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर, सचिव कल्पनाताई तोरसकर, संस्था सदस्या रश्मीताई तोरसकर, प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, समन्वय समिती सचिव नंदकुमार नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाअधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी विजय शिंदे, मनिषा पाटील, प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.एस.परब, सिंधुदुर्ग जिल्हा साॅफ्टबाॅल असो.अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, जिल्हा साॅफ्टबाॅल सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा माध्य.अध्यापक अध्यक्ष अजय शिंदे व कुडासे ग्रामस्थ यांनी  गोंधळी यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.