
सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु कॉलेज सावंतवाडीने सालाबादप्रमाणे यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. पहिल्या गटातील स्पर्धांमध्ये शालेय रोल बॉल स्पर्धेत पुन्हा एकदा आर. पी. डी. हायस्कूल व सावंतवाडी संघाने बाजी मारली. या स्पर्धेत आर. पी. डी. हायस्कूल सावंतवाडीचे तीन संघ सहभागी झाले होते. तीनही संघ प्रथम क्रमांकाने विजयी होऊन विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. 14 वर्षा खालील मुले प्रथम, 19 वर्षा खालील मुली प्रथम व 19 वर्षा खालील मुले प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले.
तसेच शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत 17 वर्ष गटात स्वप्नील लाखे द्वितीय क्रमांकासह, तालुकास्तरीय 19 वर्ष गटात प्रेम पाटील तृतीय क्रमांकासह व संस्कार मोर्ये चतुर्थ क्रमांकासह जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , पर्यवेक्षक एस . एन पाटील , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.