जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस

Edited by:
Published on: November 24, 2023 16:46 PM
views 187  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज दुपारी साडेतीन ते पाऊणेचार नंतर पावसाने अचानक हजर लावली आणि एकच गोंधळ उडाला. आज दुपारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. संध्याकाळी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन काही भागात पावसाने तुरळक प्रमाणात हजर लावली. 

यावेळी वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील काही भागात कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात पाऊस पडला पडत आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे बागायती शेतीवर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे.