उंबर्डेत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 30, 2023 19:51 PM
views 136  views

वैभववाडी : अल बरकात सोशल कमिटीच्यावतीने मोहरम शारिफच्या निमित्ताने उंबर्डे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७० रुग्णांची  तपासणी करण्यात आली.

उंबर्डे येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात रुग्णांची मधुमेह, हिमोग्लोबिन, रक्तदाब तपासणी करण्यात आली. डॉक्टर भरत कुंभार यांनी सर्व रुग्णांची मोफत तपासणी करुन मार्गदर्शन केले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अल बरकात सोशल कमिटीच्या वतीने सामाजिक भावनेतून उत्तम आरोग्यासाठी उपक्रम राबविला गेला. या आरोग्य शिबिराचे प्रास्तविक अध्यक्ष कादीरभाई फरास यांनी केले. जब्बारभाई नाचरे यांनी आभार तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जबभाई रमदुल यांनी केले.

या कार्यक्रमाला सय्यदभाई नाचरे, समिरभाई लांजेकर, महमदहनिफभाई रमदुल, हाजी अब्दुल नाचरे, दस्तागिर रमदुल, हुसेन  बोबडे, हसन पाटणकर, बिलाल रमदुल, याकुब नाचरे, महमंद रमदुल, फजल मुकादम, आसिफ रमदुल, गुलाम नाचरे, हुसेन नाचरे, मिरा नाचरे, हसन मुकादम, धोड्या रमदुल आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.