विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये रंगली कथाकथन स्पर्धा ; हे आहेत विजेते

कै. प्रा. विद्याधर शिरसाठ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन
Edited by: जुईली पांगम
Published on: August 03, 2023 20:14 PM
views 256  views

सावंतवाडी : विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसमध्ये 1 ऑगस्टला जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा पार पडली.  कै. प्रा. विद्याधर शिरसाठ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत. पारिजात फ्रेंड सर्कल आणि विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 


या कार्यक्रमाचं उद्घाटनावेळी शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय वेतुरेकर, सोनुर्ली हायस्कूलचे सहा. शिक्षक, जि. माध्य. शिक्षक - शिक्षकेतर पतपेढीचे संचालक प्रदीप सावंत, शालेय समितीचे अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, ज्येष्ठ शिक्षक विवेकानंद सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी आपल्या भाषणात कै. प्रा. विद्याधर शिरसाठ यांच्या आठवणी जागवल्या. शिरसाठ सरांच्या कार्याची ओळख भावी पिढीला होण्यासाठी शाळेने सुरु ठेवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं. 


या स्पर्धेत जिल्ह्यातील 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्व गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची पारितोषिके, सन्मानचिन्हे श्रीम. माधवी विद्याधर शिरसाठ आणि अनिरुद्ध विद्याधर शिरसाठ यांनी पुरस्कृत केली होती.

3 गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेते 

गट क्र 1 

प्रथम क्रमांक : तनिषा गुंजन केळुसकर, वेंगुर्ला नं. 1

द्वितीय क्रमांक :  यश प्रवीण सावंत, मदर क्वीन्स, सावंतवाडी 

तृतीय क्रमांक : पार्थ उमेश सावंत, मिलाग्रीस हायस्कूल 

उत्तेजनार्थ : दुर्वा मनोज राउळ, प्रा. शाळा माडखोल नं. 1 


गट क्र 2 

प्रथम क्रमांक : चिन्मय विक्रम कोटणीस,, कळसुलकर स्कूल सावंतवाडी 

द्वितीय क्रमांक :  नील नितीन बांदेकर, केंद्र शाळा नं. 1 सावंतवाडी 

तृतीय क्रमांक : तनुष्का हरिदास मेस्त्री, गिरोबा विद्यालय आरोस 

उत्तेजनार्थ : अस्मि प्रवीण मांजरेकर, RPD हायस्कूल, सावंतवाडी 

उत्तेजनार्थ : कनक दिनानाथ काळोजी, आजगाव नं. 1


गट क्र 3

प्रथम क्रमांक : श्रावणी राजन आरावंदेकर, कुडाळ हायस्कूल कुडाळ 

द्वितीय क्रमांक : शरयू देवेंद्र कुबल, आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस 

तृतीय क्रमांक : स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा

उत्तेजनार्थ : गौरवी हेमंत नाख्ये, जनता विद्यालय, तळवडे 

उत्तेजनार्थ : प्रज्ञा तुषार मोर्ये, खेमराज मेमोरील इंग्लिश स्कूल बांदा 


या स्पर्धेचे परीक्षण श्रीराम दीक्षित, सचिन धोपेश्वर, चंद्रकांत सावंत यांनी केलं. सूत्रसंचालन प्रा. मोहन पालेकर यांनी तर आभार रूपा कामत यांनी मानले.