रेनबो प्ले स्कूल आयोजित रंगोत्सव चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 30, 2025 19:18 PM
views 430  views

कणकवली : कणकवली येथे रेनबो प्ले स्कूल आयोजित रंगोस्तव चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच कणकवली येथे पार पडला. स्पर्धेत विविध इयत्तांमधील तब्बल ५० विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरविण्यात आले. यात १७ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

गाव्या अमर पवार (इयत्ता ३री), ऋत्वी अमित मयेकर (केजी), तनिष सिद्धाराम बालकोटगी (१ली), आर्या नितीन सातवसे (१२वी), नील ज्ञानेश जोशी (४थी), काव्या अनंत तायशेटे (६वी), अस्मी सचिन राव (९वी), रोहित राजेंद्र बालम (३री), रिद्धी धनंजय रेवडेकर (५वी), भार्गवी अमोल शिरसाट (४थी), रंश संदेश ठाकूर (२री), सानवी समीर कुलकर्णी (१ली), आराध्य नितीन सातवसे (५वी), नम्रता श्रीकांत कावले (७वी), मिहीर मिलिंद मेस्त्री (२री), वेदिका प्रवीण हडपी (४थी), वैभवी वीरेंद्र मोरे (९वी), विहा श्रीकांत झल्बा (१ली), विश्वास सचिन पावसकर (३री), स्वरा संदीप राणे ७वी), सृष्टी अविनाश मुरकर (७वी), जिया परशुराम दळवी (७वी) हे विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

पारितोषिक वितरण प्रसंगी आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी सम्राट कुडतरकर, डेव्हलोपमेंट मॅनेजर वामन सावंत, डॉ. कोलते, माझी उपसभापती मिलिंद मेस्त्री, निलेश राणे आदी उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कसाल विद्यानिकेतन स्कूलचे आर्ट शिक्षक तेजस गोसावी, रेनबो प्ले स्कूलच्या शिक्षिका सौ. सुजाता महाडेश्वर, नेहा पेडणेकर यांनी मोलाचे  सहकार्य केले. शेवटी रेनबो प्ले स्कूलच्या आर्ट शिक्षिका सौ श. शुभांगी राणे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.