
देवगड : देवगड तालुक्यातील सौंदाळे मांगरवाडी येथे आठव्या पोषणमाह अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त येथील अंगणवाडी केंद्रामध्ये विविध कार्यक्रमांची आयोजन करण्यात आले होते. मांगरवाडी अंगणवाडी सेविका समिती प्राची मिठबांवकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. एकात्मिक बालविकास सेवा योजना देवगड प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका पुजा सावंत कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. 'स्वस्थनारी, सशक्त परिवार' यास मूर्त स्वरुप दयायचे असेल तर प्रत्येक स्त्रीने स्वतः सुदृढ असले पाहिजे व त्याच बरोबर बालकांमध्ये कुपोषण निर्माण होऊ नये म्हणून गर्भधारणेपासूनच उत्तम आहार, नियमित तपासणी, पुरेशी विश्रांती, व्यायाम व स्वच्छता या निकषीचचे पालन करत. (जन्माला येणारे आपली बाळ सुदृढच जन्माला येईल' - असा दृढ संकल्प नारी शक्तिने करावा, असे आवाहन पर्यवेक्षिका यांनी केले. वाडा मूळबांध अंगणवाडी सेविका अपर्णा जोशी यांच्या स्वरचित पोषण गीत व फुगडी गीतांनी कार्यक्रमात मोठी रंगत आणली व यामधून भजनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात अनेक पौष्टिक पाककृतींची मांडणी करण्यात आली होती.त्या बरोबरच मुले आणि पालकांकरीता 'पोषण पंगत आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे या पडेल-2 बीट मधील सर्व अंगणवाडी कार्यक्रमास मोलाचे योगदान लाभले.










