
कुडाळ : परीट समाजाला एकत्र आणण्यासाठी असे मेळावे आवश्यक असून कुडाळ मध्ये होत असलेल्या या मेळाव्याची उपस्थिती समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांतारामभाऊ कदम यांनी सांगितले. अखिल भारतीय धोबी महासंघ, महाराष्ट्र परीट सेवा मंडळ, श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहामध्ये आज कोकण विभागीय स्नेह मेळावा आणि वधू वर मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या मेळाव्याला सिंधुदुर्गसह रत्नागिरी, रायगड, गोवा आणि बेळगाव तसेच मुंबई येथून परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परीट समाजाच्या कोकण विभागीय या तिसऱ्या स्नेह मेळावा आणि पहिल्या वधू वर मेळाव्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज प्रतिमापूजन, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन, तसेच दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांतारामभाऊ कदम, अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र परीट महासंघाचे अध्यक्ष खंडेराव कडलक, महाराष्ट्र प्रदेश महासंघाच्या प्रदेश महिला कार्याध्यक्ष सुषमाताई अमृतकर, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार राक्षे, महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे उपाध्यक्ष संतोष भाऊ भालेकर, कोकण विभागीय मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल सुर्वे, मराठा मडवळ हितवर्धक समाज मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष लक्ष्मण गावकर, समाज मार्गदर्शिका रेखाताई कदम, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्ष दिपाली भालेकर, गोवा राज्याचे अध्यक्ष नारायण पिसुर्लेकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, अशोक जाधव, सुनील फंड, गोविंद राऊत, आबा महाडिक, संजय भागवत, दुर्गेश रोकडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या मेळाव्याचे यजमानपद कुडाळ तालुक्याने स्वीकारले होते. कुडाळ तालुका महिला समितीच्या वतीने स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कुडाळ कार्यकारिणीचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कुडाळचे अध्यक्ष सदानंद अणावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हा सत्कार स्वीकारला. महिला समितीला देखील सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी प्रदेश सदस्यांना नियुक्त पत्र देखील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मेहनत करणारे तसेच ज्यांचे नाव व्यासापीठाला देण्यात आले आहे ते कै बाबी कुडाळकर यांचे चिरंजीव नागेश कुडाळकर आणि कुडाळकर कुटुंबीयांचा तसेच प्रवेशद्वाराला नाव देण्यात आलेल्या कै . सुनील म्हापणकर यांच्या कुटुंबीयांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच परीट समाजातील गुणवंत व्यक्ती विद्यार्थी यांचा देखील त्यांनी मिळवलेले यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत हा मेळावा होत असल्याचे समाधान असल्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी सांगून जिल्ह्यात संत गाडेबाबा मंदिर आणि समाजभवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप भालेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रदीप नारकर यांनी केले. या मेळाव्याला अनिल शिवडावकर, अक्षता कुडाळकर, विजय आजगावकर, दीपक नारकर, मुकेश नारकर, विजय गावकर, बाळा कुडाळकर, राजेंद्र भालेकर, श्रीकृष्ण परीट, महेंद्र आरोलकर, मोहन वालकर, भालचंद्र करंजेकर, विजय पाटील, शेखर कडू संजय होडावडेकर, रितेश चव्हाण आदी उपस्थित होते. या मेळाव्याला कोकण विभागातून सुमारे तीन हजार पेक्षा जास्त संख्येने परीट समाज बांधव उपस्थित होते. दुपारच्या सत्रात वधू वर मेळावा झाला त्यासाठी सुमारे दोनशेहून जास्त मुलांनी तर शंभर हुन जास्त मुलींनी नोंदणी केली होती.