
वेंगुर्ला : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत शिरोडा ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या ग्रामसभेत बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे यांनी प्रास्ताविकात या अभियानाची माहिती दिली. तसेच या अभियानाबाबत शिक्षक भूषण नाईक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच लतिका रेडकर उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य अनन्या घाटवळ, प्रथमेश उर्फ जगन बादेकर, प्रथमेश परब, पांडुरंग नाईक, शीतल नाईक, अर्चना नाईक , रश्मी डिचोलकर, जयमाला गावडे, अनिस्का गोडकर, नंदिनी धानजी, सुधीर नार्वेकर, मयुरेश शिरोडकर, हेतल गावडे, राजन धानजी तसेच आशा, अंगणवाडी सेविका, बचतगट महिला, आरोग्य विभागाचे अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राणे, कृषी सेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.