कुडाळातील ‘रक्तदान’ शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: भरत केसरकर
Published on: August 14, 2023 19:32 PM
views 320  views

कुडाळ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर कुडाळ आज मिल्लत क्लब, कुडाळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान  यांचे संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान’ शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी ९ ते १.३० या वेळेत अतीशय ऊत्साहात संपन्न झाले. या रक्तदान’ शिबीरात ७२ रक्तदात्यानी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आयोजकांनी सर्व रक्दात्यांचे आभार मानले.


     कुडाळ येथील  रक्तदान शिबिराचे उद्घाटन कुडाळ नगर पंचायत चे माजी नगरसेवक आणि रक्तदातेे  एजाज नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे श्री. तेंडोलकर,किशोर नाचणोलकर, जयभीम युवक मंडळ, कुडाळ चे अध्यक्ष  विद्याधर कुडाळकर, भुषण कुडाळकर, मिल्लत क्लब चे आदील शहा, नियाझ शहा, हाफीज झेैद, सज्जाद शेख, इरफान मणीयार, इरफान करोल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सिंधुदूर्ग जिल्हा रक्तपेढी चे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा यांचा सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमास कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक सौ. वृणाल मुल्ला, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, जयभीम युवक मंडळाचे पदाधिकारी विद्याधर कुडाळकर शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

   तब्बल ७२ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले. जिल्हा रक्तपेढी द्वारे सन्मान चिन्ह देऊन मिल्लत क्लब, कुडाळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या उपक्रमास  शुभेच्छा  देण्यात आल्या. हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी हाफीज झैद, मुबीन दोस्ती, फारूक दोस्ती,  इरफान करोल, अय्याज दोस्ती, रिझवान मणियार, नियाज शहा,  जफर जमादार, आदींचे सहकार्य लाभले. यापुढे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाणार असुन रक्तदान चळवळी द्वारे राखीव रक्तदाता गट देखील तयार केला जात आहे,अशी माहिती एजाज नाईक यांनी दिली.