
कणकवली : कणकवली शहर विकास आघाडीचे प्रभाग 17 चे उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी रॅली पार पडली. यावेळी मतदारांचाही नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीत माजी आमदार राजन तेली, शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, प्रभाग 15 चे उमेदवार संकेत नाईक सहभागी झाले होते.
यावेळी सुशांत नाईक यांनी गतवेळच्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. समोर पराभव दिसू लागल्यानेच त्यांच्याकडून पैशांचे वाटप केले जात आहे. प्रभाग 17 मध्ये लॅपटॉप, फ्रिज वगैरे वाटप माझ्या विरोधी उमेदवाराकडून सुरू आहे. जर हे खोटे असेल तर त्यांनी मी केलेल्या आरोपाचे खंडन करावे. माझ्या विरोधात या प्रभागातबाहेरील उमेदवार दिला आहे. मात्र या प्रभागात माझा कायमच लोकसंपर्क राहिला आहे. त्याच जोरावर मी निवडून येईन, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.
रॅलीत राजू शेटये, शहर विकास आघाडीचे प्रभाग १५ चे उमेदवार जयेश धुमाळे, तात्या निकम, मेहुल धुमाळे, साई मोरये, गुरु मोरये, संदेश जाधव, मयुरी नाईक, प्रतिक्षा साळसकर, मिनल म्हसकर, संतोष सावंत, रंजीत धुमाळे माझी नगरसेविका नंदिनी धुमाळे, रुपेश आमडोसकर, ललित घाडीगांवकर,अमोल लोके, संदेश जाधव,मयुरी नाईक आधी सहभागी झाले होते.











