सावंतवाडीत शिवरॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गावस
Published on: February 19, 2024 14:32 PM
views 43  views

सावंतवाडी : स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त "जय भवानी, जय जय शिवाजी"च्या जयघोषात स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या शिवरॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमध्ये भगवाधारी युवाई मोठ्या उत्साहानं सामील झाली होती. ऐतिहासिक वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांची लक्षवेधी उपस्थिती होती. 

या रॅलीचा शुभारंभ सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तत्पुर्वी श्री देव पाटेकरासमोर नतमस्तक होऊन रॅलीला सुरुवात केली. यावेळी छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास तेवत ठेवण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून घातलेला पायंडा असाच सुरू रहावा असे आवाहन राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी केले. दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त येथील राजवाड्यातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित तरुण तरुणींसह लहान मुलांनी भगवे फेटे परिधान केले. गाड्या, दुचाकींना भगवे झेंडे फडकवत रॅलीत सहभागी झाले. 

यावेळी सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रध्दाराजे भोंसले, अ‍ॅड. बापु गव्हाणकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी महेश पांचाळ, राजू कासकर, महेंद्र सांगेलकर, दिलीप भालेकर, अमोल साटेलकर, दिनेश गावडे, कृष्णा धुळपणावर, अमेय मोरे, सुशांत पाटणकर, प्रमोद तावडे, बाळु पार्सेकर, समीर सावंत, नंदू डकरे, कॉंग्रेसच्या साक्षी वंजारी, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे, परशुराम चलवाडी, निलिमा चलवाडी, अंकीत तेंडोलकर, सचिन कुलकर्णी, देव्या सुर्याजी, अनिष माटेकर, संजू शिरोडकर, नंदू पोकळे, अमित वेंगुर्लेकर, संदिप सावंत, अमोल टाकरे, संजय पार्सेकर, निलेश कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.