
दोडामार्ग : तालुक्याच्या विकासाची भूमिका माझ्या मनात असल्यामुळे येथील जनता माझ्याच पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास आज दोडामार्ग येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी व्यक्त केला. तेली यांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दोडामार्ग शहरात भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते यावेळी "ठाकरे शिवसेनेचा विजय असो" "तेली साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी संपर्कप्रमुख कालिदास कांदळगावकर तालुकाप्रमुख संजय गवस दोडामार्ग संपर्कप्रमुख केशव धाऊसकर सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे संदेश वरक मिलिंद नाईक शिवराम मोर्लेकर गणेश धुरी विजय जाधव लक्ष्मण आयनोडकर प्रदीप सावंत सुभाष गवस विनिता गाडी श्रेयाली गवस सुनंदा धरणे लीना कुबल चंदन गावकर वासंती मयेकर, दौलत राणे यांच्यासह शेकडो शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते. तर यावेळी प्रवीण भोसले म्हणाले दीपक केसरकर हे विश्वासघातकी आहे त्यांना शिवसेनेने मंत्री दोन वेळा आमदार अशी अनेक संधी देऊन सुद्धा त्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करू नका केसरकारांना मतदान म्हणजे गद्दारीला मतदान होय त्यांनी या मतदारसंघात काहीही काम केलेले नाही फक्त या ठिकाणी येऊन मतदारांची दिशाभूल करून घोषणा देण्याचे काम केले आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीला घरी बसवा असे आवाहन करत मशाल चिन्ह समोर बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा असे त्यांनी सांगितले.