नेमळे हायस्कुलच्या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 16, 2023 18:43 PM
views 79  views

सावंतवाडी : 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ,नेमळे हायस्कुल, तालुका सावंतवाडी या विद्यालयात देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ सर प्रशालेच्या प्राचार्या बोवलेकर मॅडम, डॉ. श्री हेमंतकुमार सावंत, स. पा. आळवे, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष म्हाडेश्वर, संस्थेचे सर्व पदाधिकारी,पालकवर्ग, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये लहान व मोठ्या गटामध्ये एकूण 11 संघांनी एकापेक्षा एक अशी सरस देशभक्तीपर गीत गाऊन स्वातंत्र्याचा जयजयकार केला, 5वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना गीतासाठी नितीन धामापूरकर यांनी तर 11वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना श्री दळवी व कासार यांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेचे परीक्षण सावंतवाडीच्या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या सुप्रसिद्ध गायिका सौ सिद्धी परब,कुमारी समृद्धी सावंत व कुमारी केतकी सावंत यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अनिल कांबळे यांनी केले. विशेष साहाय्य राजेश गुडेकर व चंद्रकांत बंगाळ सर यांचे लाभले.

हार्मोनियम-श्री नितिन धामापूरकर,तबला- कुमार सिद्धेश सावंत,साइड रिदम-कुमार आदित्य परब, 5वी ते 8वी या गटातून इयत्ता 8वी अ च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला,8वी ब च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक इयत्ता 7वी विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.9वी ते 12 वी या गटातून इयत्ता 9वी ब च्या विद्यार्थ्यांनी उत्तम सदारीकरणासह प्रथम क्रमांक प्राप्त केला,12 वीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रंमांक प्राप्त केला तर 10 वी ब च्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला,सर्व यशस्वी संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी तब्बल 6 शौर्य चक्र प्राप्त करणारे ,देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक आदरणीय श्री उत्तम पाटकर सर यांनी शाळेला भेट दिली.त्यांच्या भेटीने शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचा आनंद द्विगुणित झाला प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका बोवलेकर  मॅडम यांनी त्यांचे  स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अनिल कांबळे सर यांनी केले.