देवगड मेडिकल फाऊंडेशन यांच्यावतीने मिठमुंबरी आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 31, 2023 19:21 PM
views 58  views

देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने मिठमुंबरी गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिरात मान दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, तसेच आवश्यक त्या रुग्णांची ब्लड, शुगर, बोन मिनरल डेन्सिटि, पेरिफरल न्युरोपथी व आयएफटी टेन्स अश्या सर्व प्रकारच्या आजारांवर गावातील ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी मुबंईतील तज्ञ डॉक्टरांकडून गावातील ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांचा या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मिठमुंबरी गावातील 145 ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी सुशांत नाईक बोलत होते, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर व विभागप्रमुख गणेश वाळके हे देवगड तालुक्यात चांगल्या प्रकारे काम करत आहेत.

आज मिठमुंबरी गावात त्यांच्याच प्रयत्नातून व मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमातून आरोग्य शिबीर होत आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन. शिवसेनेचे ब्रिद वाक्य डोळ्यसमोर ठेऊन “सामाजिक कार्यातून राजकारण 80% समाजकारण व 20% राजकारण” या बाळासाहेबांच्या शिकवणीतून अशे उपक्रम युवासेने च्या माध्यमातून राबवले जातात. काही दिवसापूर्वी कामगार सबासद नोंदणी देखील राबविण्यात आली. या शिबिराला मिठमुंबरी गावातील महिला -पुरुष तसेच जेष्ठ नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात होणारे सामाजिक कार्याबद्दल डॉ.तन्मय आठवले यांच्याकडुन कौतुक करण्यात आले. व आमच्यावतीने यापुढे सामाजिक कार्यासाठी लागणारी मदत आम्ही करत राहू असे उद्गार डॉक्टर यांनी बोलताना काढले. तसेच गावातील ग्रामस्थांनी देखील युवासेना व तालुका प्रमुख गणेश गावकर व त्त्यांच्या संपूर्ण टीम चे आभार मानले.

या शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अमित तोडणकर, डॉ. तन्मय आठवले. डॉ. मंजुषा आठवले, प्रसाद कदम, क्रिष्णा पेंडुरकर, रोहित सावंत, अक्षता तारकर, अक्षता नागवेकर, दशरथ हक्के, देवगड युवासेना तालुका प्रमुख गणेश गांवकर,. युवासेना विभाग प्रमुख गणेश वाळके, ग्रामपंचायत सदस्य अश्मिरा गांवकर, संदीप मुंबरकर, मिठमुंबरी शाखाप्रमुख अमित गावंकर, आशिष साद्ये व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.