महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र सैनिक जादूगार केतन कुमार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 17:33 PM
views 218  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी पुरस्कृत महाराष्ट्र सैनिक जादूगार केतन कुमार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी हाॅस्पिटलमधील रूग्णाना, त्याच्या नातेवाईकांना चहा बिस्कीट व पोहे वाटप केले. 

या कार्यक्रमाच उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, बालरोग तज्ञ डॉ. संदीप सावंत, आयुर्वेदिक तज्ञ डॉ. सागर जाधव, जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे, परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड. राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, माजी शहराध्यक्ष अभिमन्यू गावडे, कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत, मनविसे कॉलेज युनिट अध्यक्ष साहिल तळकटकर, अर्पिता मळेकर, दिपाली राऊळ, अनुष्का मळेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब उपस्थिततांना मार्गदर्शन करताना म्हणाले, रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यावा आपले कार्य पाहून देवालाही आपण जन्म दिल्याचा अभिमान व्हावा असे कौतुक जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले. रक्तदान शिबिर संयोजकामुळे समाज सुंदर होत आहे. त्यातूनच कार्यकर्त्याची भावी पिढी घडणार आहे दुसऱ्यासाठी जगणे हेच खरे जगणे या कार्यक्रमातून केतन सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त चांगल्या कार्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा  मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून अशा सामाजिक कार्यक्रमासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे असे मार्गदर्शक उपस्थित केले. यावेळी स्वतः जिल्हाध्यक्ष धीरज परब व मनसे विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष सुधिर राऊळ यांनी रक्तदान केले. तसेच माजी शहराध्यक्ष अभिमन्यू गावडे यांनी रक्तदान केले  तसेच  जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पोहे, बिस्कीट, व चहा वाटपाचा कार्यक्रम केतन सावंत व सुधीर राऊळ यांनी केला. 

यावेळी आदित्य राऊळ, शतायु जांभळे, तुकाराम मुळीक, दिपाली राऊळ,  अर्पिता मळेकर, उदय सावंत, आदित्य कोंडविलकर, आदित्य राऊळ, विशाल दळवी, अनुष्का मळेकर, आकाश मराठे , अनिकेत दळवी आदी उपस्थित होते.