
कणकवली : कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाच्या औचीत्याने युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ - सांगवे यांच्या वतीने जि. प. शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे आज बुधवार दिनांक ६ सप्टेंबर २ç२३ रोजी वक्तृत्व स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी करण्यात आले यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत, नंदकुमार काणेकर, विजय भोगटे, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, नाटळ सरपंच सुनिल गावकर, दिगवळे सरपंच संतोष गावकर, केंद्र प्रमुख उत्तम सूर्यवंशी, विजय भोगले, महेंद्र पवार, संदीप तांबे, नरेंद्र चिंदरकर आदी उपस्थित होते.
कनेडी प्रभाग स्तरीय आयोजित वक्तृत्व,निबंध स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा मध्ये एकुण 189 विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वरूपा ढवळ, रेश्मा सावंत, माधवी राणे, प्रांजली मसुरकर अक्षता बंड, महेश चव्हाण यांनी मेहनत घेतली.