भेडशीतील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

Edited by: संदीप देसाई
Published on: September 24, 2023 17:03 PM
views 91  views

दोडामार्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सेवा भारती संचलित रूग्णोपयोगी साहीत्य सेवा केंद्र भेडशी ता. दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

          प्रथम दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष  डाँ सवदत्ती व श्री वैद्य सरांनी सेवा भारती संदर्भात माहीती देऊन शिबीरास शुभेच्छा दिल्या. यावेळी  सार्वजनिक गणेश मंडळ भेडशीचे अध्यक्ष नंदकिशोर टोपले, प्रकल्प प्रमुख सिध्देश पांगम, सा भेडशी ग्रा पं उपसरपंच गणपत डांगी, ग्राम.वि.कमिटी सचिव राजन मुंज, ग्रा प सदस्य संतोष भिसे, व्यापारी गौरीश वेटे , व्यापारी श्री सनी केसरकर,  निलेश तळणकर,प्रसाद बोंद्रे, रुषी सोलापुरकर , बिट्टु मणेरीकर, मिथुन बेळेकर व भेडशी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सेवा भारती केंद्र भेडशीचे सदस्य गोविंद शिरसाठ व राहुल गौंडळकर यांनी विशेष मेहनत घेतली. या वेळी सिध्देश पांगम यांनी नेत्रतज्ञ डाँ.सिध्दी सामंत त्याचे सहकारी व गणेश मंडळाचे आभार मानले.