
वेंगुर्ले : मातोंड नाटेलीवाडी येथे श्री देव खरोबा मित्रमंडळ मातोंड नाटेलीवाडी आयोजित उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आणि एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेज, लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या माध्यमातून रविवार दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी महाआरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन मातोंड ग्रामपंचायत सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपसरपंच आनंद परब, माजी पंचायत समिती उपसभापती प्रफुल्लचंद्र परब, ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब, विशाल बागायतकर, वैभवी परब, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरासाठी लाईफटाईम हॉस्पिटलचे डॉ.प्रकाश घोगळे, डॉ.योगेश केंद्रे, डॉ.अभिजित खाके, डॉ.निलेश मेत्रे, गोविंद परब यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराचा तब्बल १०३ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात नेत्र तपासणी, हृदय तपासणी, रक्त, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या. यावेळी लाईफ टाईम हॉस्पिटलचे पूर्वा धुरी, सरफराज नाईक,ज्योती चव्हाण,रितेश घाडीगांवकर,राकेश पुजारे, विकास लुडबे यांचे सहकार्य लाभले.
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी श्री देव खरोबा मित्रमंडळाचे कार्यकर्ते सत्यवान वैद्य, मंगेश जबडे,प्रसाद जबडे,जयराम केणी,आनंद जबडे,गुरुनाथ नाईक,परशुराम नाईक, नंदकिशोर जबडे,विजय कोरगावकर,सुनिल जबडे,प्रथमेश नाईक,अंकुश नाईक, सचिन नाईक,संदेश कोरगावकर,कृष्णा नाईक,अरुण मयेकर,विशाल बागायतकर,प्रशांत जबडे,दत्ताराम (तातलो) परब,पूजा वाडयेकर,सुविधा वाडयेकर, ओमकार कोरगावकर,नारायण केणी, साहिल नाईक,प्रसाद नाईक यांनी मेहनत घेतली. शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद नाईक यांनी केले.