वेंगुर्ला येथील मोफत समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद...!

Edited by: दिपेश परब
Published on: May 19, 2024 13:56 PM
views 263  views

वेंगुर्ला :  वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर सुरु असलेल्या समर कॅम्पचा समारोप नुकताच झाला. या समर कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. व्ही.जी.फिटनेसतर्फे कॅम्प मैदानावर १३ ते १९ मे या कालावधीत सकाळी ८ ते ९ या वेळेत मोफत समर कॅम्प आयोजित केले होते. याचे उद्घाटन शंकर मांजरेकर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात व्यायाम व खेळाबरोबरच विविध उपक्रमही घेण्यात आले. मुलांसोबत पालकांनीही स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनाही मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. समारोपप्रसंगी अॅड. मनिष सातार्डेकर यांनी फिटनेस महत्त्व सांगून व्हि.जी.फिटनेसचे अध्यक्ष वासुदेव गावडे यांचे कौतुक केले.

हे समर कॅम्प यशस्वी होण्यासाठी बॉथम ऑल्मेडा, मृणाल परब, समिर प्रभूखानोलकर, शामल मांजरेकर, कविता चौधरी यांच्यासह व्हि.जी.फिटनेसचे सदस्य विकास सावळ, सिताराम कावळे, प्रतिराज कुडपकर, दिनेश कुडपकर, स्वाती गावडे तसेच सहभागी सर्व मुलांच्या पालकांचे सहकार्य लाभले.