दोडामार्ग येथील मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद

गोवा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान व नगरपंचायत कसई - दोडामार्गचे नागरिकांनी मानले आभार
Edited by:
Published on: June 12, 2023 22:55 PM
views 162  views

दोडामार्ग : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा, आयुष मंत्रालय, भारत सरकार के अंतर्गत स्वायत्त संस्थान आणि नगरपंचायत कसई दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

पिंपळेश्वर हॉल, बाजारपेठ दोडामार्ग येथे झालेल्या या शिबिराचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योती जाधव, नगरसेविका सौ. सुकन्या पनवेलकर, सौ. स्वराली गवस, सौ. क्रांती जाधव, नगरसेवक संजय खडपकर,अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रशांत ससाणे,श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे विभागीय संचालक अरुणा वाघ, गोवा मानव विकास विभागाचे सेक्युरिटी ऑफिसर वासुदेव मोठे, स्वामी विविकानंद संस्था कडणे मोपा गोवाचे उमेश गाड, डॉ. स्वप्निल आवटी डॉ. त्रिजल डॉ. फोरम जोशी, डॉ. पलक सिंगल, डॉ. अलरिजा फर्नांडिस व भक्ती चव्हाण, दर्शन सावंत, ज्योत्स्ना गवस, फ्लोरिना फर्नांडिस, वक्रतृंड मंडळाचे मनोज पार्सेकर, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ गवस, स्वप्नील गवस उपस्थित होते. शिबिर उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय ससाणे, आभार मनोज पार्सेकर यांनी मानले.

या शिबिरात सहभागी झालेल्या शेकडो नागरिक व रुग्णांना हृदयरोग, उच्च रक्तदाब, हाडांचे व सांध्यांचे आजार, थायरॉईड, अॅलर्जी व दमा श्वसन विकार पक्षाघात, वात विकार, त्वचाविकार, बालरोग, लिव्हर व किडणी विकार, मधुमेह, मूळव्याध, स्त्रीरोग, अन्य जुनाट विकार यावर मोफत तपासणी करून मोफत औषधांचे सुध्दा वाटप करण्यात आले. आपण या शिबिरासाठी घेतलेल्या पुढाकराला नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केल्याने व या शिबिराचा लाभ शहरासह पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांना मिळाल्याने शिक्षण व आरोग्य सभापती सौ. गौरी पार्सेकर यांनी समाधान व्यक्त केले.

विशेष कौतुक

गोव्यातून आलेल्या आयुर्वेद संस्थानचे डॉ. ससाणे व श्रम व रोजगार मंत्रालयाच्या विभागीय संचालक अरुणा वाघ यांनीही शिबिरात सहभागी रूग्ण व यासाठी मेहनत घेणाऱ्या दोडामार्ग नगरपंचायतचे विशेष कौतुक केलं.