आप्पा लुडबे आयोजित नेत्रतपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 09, 2023 17:35 PM
views 159  views

मालवण : माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी वायरी येथे आयोजित केलेल्या नेत्रतपासणी शिबीर आणि आधारकार्ड दुरुस्तीला उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे २०० लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. 

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी यापूर्वी आधारकार्ड दुरुस्ती शिबिर लावले होते. या शिबिरात आधारकार्ड मधील नाव दुरुस्त करणे, पूर्ण जन्मतारीख दुरुस्त करणे, पूर्ण जन्मतारीख घालणे, फोटो बदलणे, मोबाईल नंबर अपडेट करणे, पत्ता बदलणे, मुले मोठी झाली असल्यास फोटो बदलणे असे शिबीर लावले होते. त्यानंतर आज पुन्हा असे शिबीर आयोजित केले होते.

तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन केले होते. या दोन्ही शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी संजय पाताडे, गोविंद गावकर, दिपक कुडाळकर, साक्षी जूवाटकर, बाबलू लुडबे, अतुल हडकर, भाई लुडबे, संजय वराडकर, हेमंत मिठबावकर, राजन गवंडी आदी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.