
सावंतवाडी : भारतीय किसान संघाच्यावतीने 19 डिसेंबरला दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी भव्य किसान गर्जना रॅली आयोजित केली आहे. या मागण्या शेतकऱ्यांकडे पोचवण्यासाठी भारतीय किसान संघ, सावंतवाडी तालुक्याची संपर्क यात्रा नुकतीच करण्यात आली होती. यावेळी १४ गावामध्ये संपर्क करून मागण्याची माहिती देण्यात आली. या यात्रेमध्ये १००० पत्रके व २५ पुस्तिका वितरित करण्यात आल्या. या यात्रेमध्ये जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व तालुका पदाधिकारी, ग्रामसमिती कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी किसान रॅलीच्या मागण्यांना आपला उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला.
प्रमुख मागण्या : उत्पादन खर्चावर आधारित (सर्व उत्पादन खर्च+५०%नफा) लाभकारी मूल्य देणारा कायदा करण्यात यावा, शेतीला लागणारी निविष्ठा,औजारे यावरील GST रद्द करावी, किसान सन्मान निधी मध्ये पुरेशी वाढ करण्यात यावी, रासायनिक खतांच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांना प्रति एकराच्या प्रमाणात DBT द्वारे द्यावे.