रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...!

Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2024 08:12 AM
views 140  views

सावंतवाडी : रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे संस्थापक सदस्य स्व. बाळभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात रक्तदात्यानी रक्तदान करून स्व. बाळभाई बांदेकर यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली. स्व. बाळभाई बांदेकर रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीत पोलिओ डोस व गरजुना रक्त उपलब्ध करून देणे तसेच रक्तदान शिबीर असे अनेक समाजपयोगी राबविले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करते.

या रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे प्रेसिडेंट प्रमोद भागवत, अनंत उसगावकर, डी जी बांदेकर ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद उर्फ केदार बांदेकर, कॉलेजचे प्राचार्य उदय वेले, सौ रश्मी गोविंद बांदेकर, प्रवीण परब, सोमनाथ जिगजींनी, सुबोध शेलटकर, नागेश कदम, कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. बाळभाई बांदेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी स्व. बाळभाई बांदेकर यांचा पुतण्या, डी जी बांदेकर ट्रस्टचे अध्यक्ष तथा स्व.  बाळभाई बांदेकर यांच्या  नावे सुरु केलेल्या बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टचे कार्यकारिणी सदस्य  गोविंद उर्फ केदार बांदेकर, कॉलेजचे प्राध्यापक तसेच अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान करून स्व. बाळभाई बांदेकर यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली.