
वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील आदित्य हळदणकर मित्रमंडळाच्या वतीने आज २४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उदघाटन वेंगुर्ला वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी माईणकर- सामंत, निवृत्त गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, बॅ खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ विलास देऊलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॅ खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ आनंद बांदेकर यांनी केले. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी मंडळाचे शिव केरकर, सौरभ धुरी, प्रशांत गावडे, पीटर डिसोजा, अमित नाईक, राहुल हळदणकर, चैतन्य म्हापणकर यांनी मेहनत घेतली. सर्वांचे आभार आदित्य हळदणकर यांनी मानले.