मातोंड येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Edited by: दिपेश परब
Published on: June 09, 2024 14:14 PM
views 430  views

वेंगुर्ले : ग्रामपंचायत मातोंड आणि युवा रक्तदाता मित्रमंडळ, मातोंड यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ.संजीव लिंगवत, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, दिपेश परब, वैभवी परब, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, सोसायटी संचालक एम.जी.मातोंडकर, सिद्धार्थ पराडकर, महेश वडाचेपाटकर आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ.पटेल, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, राजेंद्र गोरा, अनिल खाडे, राहुल जाधव यांचे सहकार्य लाभले.

या शिबिरात डॉ.संजीव लिंगवत, ग्रा प माजी सदस्य नितीन परब, गोविंद परब, महेश वडाचेपाटकर, सुंदर पाटकर, वैभवी परब, विठ्ठल सावंत, चंद्रकांत गावडे, राहुल प्रभू, शिवराम सावंत, साहिल नाईक, कृष्णा गावडे, दशरथ गडेकर (आडेली), रामचंद्र परब, मनोहर तांडेल (नवाबाग),मंगेश माणगावकर, गिरीष प्रभू, सर्वेश घाडी, काशि परब, वासुदेव परब, महेश गवंडे,ओमकार गवंडे, अनुजा परब (भालावल), स्वप्नील परब, देवदास परब,ओमकार कोरगावकर, सचिन कोंडये, प्रसाद नाईक, देवेंद्र परब, रूपक मातोंडकर इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व कै. पांडुरंग महादेव नाईक यांच्या स्मरणार्थ साहिल नाईक यांच्यामार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ला चे तालुका उपाध्यक्ष राजेश पेडणेकर, सचिव श्रीकृष्ण कोंडस्कर, खजिनदार भूषण मांजरेकर, भाजप तालुका कार्यकारीणी सदस्य वसंत तांडेल, युवा मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष मनोहर तांडेल, दशरथ गडेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, ग्रा प सदस्य राहुल प्रभू, दीपेश परब, बाबली गवंडे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्लाचे तालुका कार्यकारीणी सदस्य प्रसाद नाईक, सचिन कोंडये, नितीन परब -तळवडेकर, साहिल परब, काशी परब, साहिल नाईक, देवेश परब, वासुदेव परब, दिगंबर मातोंडकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ला चे तालुका कार्यकारीणी सदस्य  प्रसाद नाईक यांनी केले.