
वेंगुर्ला : आकाश फिश मिल अँड फिश ऑइल प्रा. लि. कंपनीच्या वतीने केळुस येथील कंपनीच्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सध्या जिल्ह्यात असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता हे रक्तदान शिबीर कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन आकाश फिश मिलचे जनरल मॅनेजर राजाराम बेदरकर यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कंपनीचे कर्मचारी फरहान आजरेकर, सुजित केळुसकर, रमिझ शेख यांच्या हस्ते रक्तदात्यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र व रक्त विघटन रक्त केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली भांडारे, डॉ. अभिषेक गुप्ता, अधिपरिचारिका नीता आरोलकर, समाजसेवा अधीक्षक नितीन तूरनर, रक्तपेढी तंत्रज्ञ मयुरी शिंदे, सहाय्यक ऋतुजा हरमलकर, परिचर नितेश पाटील, परिचर प्रथमेश घाडी, नितीन गावकर आदींचे सहकार्य लाभले.