सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजच्या मुंबईतील प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

3 ते 4 हजार ग्राहकांची प्रदर्शनाला भेट
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 19, 2023 08:23 AM
views 153  views

 मुंबई : सिंधुदुर्ग क्रेडाई संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज हे वास्तू प्रदर्शन मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या सभागृहात दिनांक १४ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले होते.


नीटनेटके आयोजन, प्रशस्त स्टॉल्स. अतिशय उत्तम मांडणी या वैशिष्ट्याबरोबरच नामांकित बिल्डर्स यांच्याबरोबरच नवनवीन बिल्डर्सचा या प्रदर्शनात सहभाग हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते. सामान्यांच्या खिशाला परवडतील, असे अनेक वास्तू प्रकल्पांचा समावेश होता. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, तरळा, आचरा, मालवण, कुडाळ, ओरोस, सावंतवाडी या ठिकाणचे गृहप्रकल्प मुंबईकरांना पाहायला मिळाले. थेट बिल्डर्सशी समक्ष संवाद साधता आला. यामुळे अनेक प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस, बंगले यांचे बुकिंग देखील ग्राहकांनी केली.


मुंबईकर कोकणवासीयांनी या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. ३ ते ४ हजारांच्यावर ग्राहक या तीन दिवसात प्रदर्शनाला भेट देवून गेले.


सिंधुदुर्गातील अनेक वास्तू प्रकल्प एकाच ठिकाणी पहाण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईकरांना लाभली. 


सिंधुदुर्ग क्रेडाई संस्थेने केलेले वास्तू प्रदर्शन वाखाणण्याजोगे होते. त्यांनी घेतलेले कष्ट निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर घेवू पाहणाऱ्या ग्राहकांना व गृह प्रकल्प करणाऱ्या व्यावसायिकांनाही लाभदायक ठरतील हे नक्की.