SPKची ऐश्वर्या पेंडसे मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्रात प्रथम

Edited by: विनायक गावस
Published on: September 06, 2023 16:02 PM
views 124  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची  विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या दीपक पेंडसे ही तृतीय वर्ष कला शाखेमध्ये  एप्रील 2022 या परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयांमध्ये मुंबई विद्यापीठात प्रथम आली.  तिला डॉ. लक्ष्मीनारायण के. मुंद्रा भारतीय मेमोरियल पारितोषीक दहा हजार  प्राप्त झाले.  


या यशाबद्दल  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत  राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा श्रीमंत  राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले ,संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत  भोंसले , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल यांनी अभिनंदन  केले आहे. कु.ऐश्वर्या पेंडसे  हिचा संस्थेच्या कार्याध्यक्षा  श्रीमंत राणीसाहेब सौ  शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर उपस्थित होते.

     

तिला अर्थशास्त्र विभाग प्रमुख  प्रा. सौ . निलम धुरी प्रा.तानाजी कांबळे व प्रा. अभिजीत शेटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कु. ऐश्वर्या पेंडसे हीला वाचनाची आवड असुन तिने अभिनय, वक्तृत्व ,गायन  यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये  यश मिळवलेले आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरांतुन अभिनंदन होत आहे.