
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थांचे भूतपूर्व अधिपती हीज हायनेस श्रीमंत पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची 87 वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचा वार्षिक 'खेमराजीय` अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेमासावंत भोंसले , प्रमुख अतिथी डॉ जी ए बुवा ,संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई ,सहसंचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल , लाॅ काॅलेजच्या प्राचार्या डाॅ.अश्विनी लेले. मुख्याध्यापिका सौ.अनुजा साळगांवकर संस्थानवर व राजघराण्यावर प्रेम करणारे नागरीक यामध्ये अण्णा केसरकर, प्रा.अन्वर खान, अँड. नकुल पार्सेकर, सुरेश गवस, माजी सभापती भगवान देसाई, प्रेमानंद देसाई, माजी जिल्हापरीषद सदस्या रेश्मा सावंत,काका मांजरेकर, मंगेश तळवणेकर,महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून झाली. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले .त्यांनी महाविद्यालयाच्रा गेल्या वर्षीचा प्रगतीचा आढावा घेतला.श्री पंचम खेमराज महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठांतर्गत स्वायत्त दर्जा मिळालेले कॉलेज असुन 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' येथे 2023-24 मध्ये राबवण्यात आलेले आहे. मराठी कनिष्ठ विभागाचे प्रा. माधव भिसे यांनी बापूसाहेब महाराजांच्या जीवनावर चिंतन केले. राजमाता सत्वशीलादेवी भोंसले कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता बारावी मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचा वार्षिक 'खेमराजीय` अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.जी ए. बुवा यांनी पुण्यश्लोक बापूसाहेबांच्या जीवनातील विविध घटनांचा उल्लेख केला.त्यांचे आध्यात्मिक गुरु साटम महाराज यांच्याशी घडलेले प्रसंग त्यांनी कथन केले.
सावंतवाडी शहरामध्ये डास निर्मूलन असो, गावा गावामध्ये रस्ते असो,अनेक शाळाही त्यांनी सुरू केल्या. महात्मा गांधीजींनी त्यांना रामराजा असे संबोधीले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना न्यायप्रिय राजा अशी उपाधी दिली. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे रूपाने त्यांचे हे शैक्षणिक स्मारक1961 त्यांचे चिरंजीव श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांनी उभारले व त्यांची आजची पिढी ही त्याच आस्थेने व पूर्ण क्षमतेने या स्मारकाची जोपासना करीत आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ पुनम सावंत यांनी केले तर आभार डॉ. उमेश पवार यांनी मानले.