
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीत माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्यावतीने एक दिवसीय टेकफेस्ट 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
वेब डेव्हलपमेंट, मोबाईल फोटोग्राफी ,मोबाईल व्हिडिओग्राफी, स्टार्टअप प्रेझेंटेशन,ब्लाईंड टायपींग,डेटाबेस मास्टरमाईंड, बॅटलग्राउंड मोबाईल इंडीया या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन आयटी विभाग प्रमुख,सौ अक्षता गोडकर व संगणक शास्त्र विभाग प्रमुख विभा गवंडे त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी आत्माराम तोरसकर व पुजा नाईक यांनी विभागाचे वतीने केले आहे तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आत्माराम तोरसकर 9423760518, पुजा नाईक 7083650704संपर्क साधावा.