SPK केत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 09:50 AM
views 92  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी  येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये कला व सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, डी एल एल इ, अर्थशास्त्र विभाग विविध जिल्हास्तरीय, विभागीय, विद्यापीठ, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग व प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले तसेच संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डी.टी देसाई, सहाय्यक संचालक अँड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सी ए नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी आप्पा हीर्लैकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी श्वेतांबरा सावंत, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर यांनी केले. त्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 या  मध्ये महाविद्यालयाने प्राप्त केलेला स्वायत्त दर्जा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महाविद्यालयामध्ये लागू झाले. तसेच विभागीय स्तरावर व विद्यापीठ स्तरावर  विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट  कामगिरी केली याचा आढावा घेतला. कला व सांस्कृतिक विभागांमध्ये विद्यापीठ स्तरावर हिंदी स्कीटमध्ये रौप्य पदक, फोक डान्समध्ये ब्राँज पदक, क्लासिकल म्युझिक हार्मोनियम मध्ये प्रथम क्रमांक , स्टोरी टेलिंग मध्ये उत्तेजनार्थ, स्टोरी रायटिंग, मराठी स्किट, मोनो एक्टिंग तसेच  ग्रुप डान्स यामध्ये विद्यार्थिनींनी प्राविण्य मिळवले त्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

क्रीडा विभागामध्ये कोकण विभाग आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेटमध्ये  महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. त्याचबरोबर बास्केटबॉल मध्ये ही संघ विजेता ठरला. हँडबॉल, फुटबॉल, शूटिंग, जुडो या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध स्तरावर विद्यार्थ्यांची निवड झाली. एनसीसी नेव्ही व एनसीसी आर्मी यामध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. डी एल एल इ च्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्ट्रीट प्ले मध्ये महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी  कु. ऐश्वर्या दीपक पेंडसे  हीची अविष्कार स्पर्धेमध्ये  निवड. झाली त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. कु. विद्या राजकुमार सावंत हीने महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज जिल्हास्तरीय विजेतेपद मिळवुन मा.जिल्हाधिकारी व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पासाठी एक लाख  रूपये  बीजभांडवल मिळाले करीता सत्कार करण्यात आला.

सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मानचीन्ह  देऊन  करण्यात आला. सुत्रसंचालन डाॅ.एस ए.देशमुख यानी केले तर आभार डाॅ.यु.सी.पाटील यांनी मानले.