
सावंतवाडी : आजच्या आधुनिक जगात संकटाने, अंधश्रध्देने ग्रासलेल्या लोकांना सगुण भक्तीद्वारे स्वामी नामाची संजीवनी देऊन सहज भक्तीच्या मार्गाचे महत्व पटवून देणारे अध्यात्मिक व्यक्तीमत्व म्हणजे श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरू गावडे काका महाराज यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री सद््गुरू भक्त सेवान्यास, माडयाची वाडी, कुडाळ येथे शुक्रवारी (दि. ३१) सकाळी सद््गुरूंच्या दीर्घायुष्य आरोग्यासाठी स्वामींवर अभिषेक, नंतर मूक-बधिर चित्रकार मुलगीचा सन्मान, कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदत, गरजू व गरीब क्षयरोगींना दत्तक घेऊन त्यांना अन्नधान्याचे वाटप. त्यानंतर सद््गुरू गावडे काका महाराजांचे प्रबोधन व मार्गदर्शन, अखंड महाप्रसाद व दर्शन सोहळा होणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद््गुरू भक्त सेवान्यास, माडयाची वाडी, कुडाळ यांनी केले आहे.